loading

बिघडून घडणारा न्युरोसर्जन …

फोनची रात्री अपरात्री घंटी वाजते . बायको आणि मुलीच्या झोपेचं खोबरं झालं म्हणून होणारा चुकचुकाट हा नेहमीचाच . मी शक्य तितक्या हळू आवाजात बोलायचं म्हटलं तरी Damage is already done. मग नेहमीप्रमाणे भैरु उठतो आणि दिवसाच्या कुठल्याही वेळी घर सोडतो . ही तशी कुठल्याही Emergency शी निगडीत डॅाक्टरची नेहमीची कहाणी . गाडी चालवताना रेडियोवरचे फक्त वॅाचमन , घुबडं आणि न्युरोसर्जन ह्यांनीच ऐकायचे कार्यक्रम ऐकताना “ याचीसाठीच का केला होता अट्टाहास ?” हा विचार शिवून जातोच .


हॅास्पिटल मध्ये जाताच नेहमीचं anxious वातावरण !! Emergency किंवा ICU मध्ये गलितगात्र होऊन पडलेली case … mind you , माणूस नाही . अशा वेळी अचानक तुमच्या मनावरची सर्व मरगळ , आळस झटकला जातो आणि adrenaline pumps in. मग सर्व examination, scans वगैरे सोपस्कार झाल्यानंतर तुम्ही Decision घेऊन पुढच्या कामास लागता .

सर्वात आधी नातेवाईकांना counselling हा बर्याच ठिकाणी अनावश्यक समजला जाणारा सोपस्कार . खोटं कशाला बोलू , हा विचार तुरळक वेळी माझ्याही मनांत येतो . तुम्ही खु्र्चीवर बसता , नातेवाईक येतात आणि तुम्ही परिस्थिती समजावून सांगतां . नातेवाईकही सर्वसाधारण पणे तुमचं ऐकतातच. काही विरळा महाभाग वगळता ही परिस्थिती अशीच असते .
तुम्ही surgery करता , OT मधून बाहेर येतां . तुमच्यातली माणुसकी आणि professional ethics जागे असल्यास पुन्हा नातेवाईकांशी बोलतां आणि घरी निघतां . सर्वसाधारणपणे इथे तुम्ही relax होता , परंतु आशा आणि निराशेचा खरा खेळ इथेच सुरू होतो . तुमच्या practice च्या सुरवातीच्या दिवसांत by default तुमचं beginners luck असतं . निदान माझ्या बाबतीत तरी असं झालं . सुरवातीच्या १५-२० cases बर्या होऊन घरी गेल्या . स्वत:वरचा विश्वास वाढला , आपण पेशंटला बरं केल्याची प्रौढी येऊ लागली , नाही म्हटलं तरी ग ची बाधा झालीच . वागण्यात काही प्रमाणात arrogance येऊ लागल्याची जाणीव बायको , आईवडील ह्या सुह्रुदांनी करुन दिलीच . But success does blind you.
आणि अचानक दिवस बदलले , तुम्ही बिनचूक surgery करूनही unforeseen complications व्हायला लागली . सरळ बाहेर येणारे पेशंट्स अचानक deteriorate होऊ लागले . अचानक ४ वर्षाच्या मुलाच्या वडिलांना , नुकत्याच लग्न झालेल्या नवपरीणितेच्या नवर्याला , १७-१८ वर्षाच्या मुलाच्या आईला , ४५ वर्षाच्या नुकत्याच विधवा होऊन २ मुलं वाढवणार्या पेशंटच्या म्हातार्या आईला काय तोंड दाखवावं हे समजेना . ICU मधील पेशंटच्या गांजलेल्या नातेवाईकांचे करूण चेहरे बघवेनात .

गुरुजनांचं “ I have spent innumerable sleepless nights fighting over my failures than celebrating my success stories 😩. “ हे वाक्य आठवलं . देवबीव न मानणारा मी काहीतरी unknown ला दूषणं देऊ लागलो . एके दिवशी हताश होता OPD त बसलो असताना एका ICU असलेल्या तरुण मुलाची म्हातारी आजी माझ्याकडे येऊन का कोणास ठाऊक पण माझ्या पायावर डोकं ठेऊन ढसाढसा रडली !! माझ्या चाललेल्या अथक प्रयत्नांचं तिला कौतुक होतं .


आणि अखेर दिवस पुन्हा पालटले !!! अचानक मागोमाग केलेल्या complicated, poor outcome cases अचानक बर्या होऊ लागल्या . कसं माहीत नाही पण गाडी अचानक रुळांवर आली . देवावर माझा आधी आणि आत्ताही विश्वास नव्हता , पण कुठेतरी स्वत: वरचा विश्वास कमी झाला आणि काहीतरी पण बरं करतं हेही पटलं .


आताही रात्री अपरात्री फोन खणाणतो , मी तसाच परत उठतो आणि निघतो …. पण ह्यावेळी पेशंटची नाही तर माणसाची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला . कारण “काहीतरी “ आपल्या सगळ्यांना त्यात मदत करत असतं .

Write a Reply or Comment

Your email address will not be published. Required fields are marked *